मुंबईत झाली एसी लोकलची चाचणी

मुंबईकरांचं एसी लोकलनं प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच सत्यात उतरू शकतं.

Updated: Apr 12, 2017, 06:52 PM IST
मुंबईत झाली एसी लोकलची चाचणी title=

मुंबई : मुंबईकरांचं एसी लोकलनं प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच सत्यात उतरू शकतं. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या चाचण्यांना अखेर सुरुवात झाली आहे. या चाचण्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

११ महिन्यांपूर्वीच एसी लोकल मुंबईमध्ये दाखल झाली होती. पण तांत्रिक अडचणींमुळे ती सुरू होण्यास विलंब लागत होता. आता रुळांवर एसी लोकल दिसल्यामुळे लवकरच ही एसी लोकल सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.

पाहा एसी लोकलच्या चाचणीचा व्हिडिओ