राज्यात ऑटो युनिअनचा संप सुरु

राज्यभरातील रिक्षा टॅक्सी संघटनांनी आज संपाची हाक दिलीय. शशांक राव यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठ्या ऑटो युनिअनने हा संप पुकारलाय. 

Updated: Jun 17, 2015, 09:24 AM IST
राज्यात ऑटो युनिअनचा संप सुरु title=

मुंबई : राज्यभरातील रिक्षा टॅक्सी संघटनांनी आज संपाची हाक दिलीय. शशांक राव यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठ्या ऑटो युनिअनने हा संप पुकारलाय. 

राज्य सरकारनं हकीम समिती रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्याविरोधात मोबाईल अॅपद्वारे बुक करण्यात येणा-या उबेर, ओला, मेरु, अशा कंपन्यांवर बंदी करण्याची मागणी राव यांच्या युनियननं केलीय.

तसंच हकीम समितीच्या शिफारशी लागू करा तसंच भाडेवाढीची मागणी त्यांनी संपकरी संघटनेनं केलीय. आजच्या रिक्षा टॅक्सी संपाचा फज्जा उडालाय. कारण शिवसेनेपाठोपाठ मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं या संपातून माघार घेतलीय.

याआधी बाबा आढाव यांच्या रिक्षापंचायतनंसुद्धा या संपात सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे संपाची हवा निघून गेली आहे. दरम्यान, आमचा संप सुरुच राहिल, असे शशांक राव यांनी म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.