बांद्रा येथे चार मजली इमारतीला मोठी आग

बांद्रामधील एस.व्ही रोडवरील पी एन ज्वेलर्सच्या चार मजली इमारतीला मोठी आग लागली आहे. टेरेसवर असलेल्या सकाळी हॉटेलला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टॅंकर रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Updated: Oct 11, 2014, 10:09 AM IST
बांद्रा येथे चार मजली इमारतीला मोठी आग title=

मुंबई : बांद्रामधील एस.व्ही रोडवरील पी एन ज्वेलर्सच्या चार मजली इमारतीला मोठी आग लागली आहे. टेरेसवर असलेल्या सकाळी हॉटेलला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टॅंकर रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 
 
आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जवान करत आहेत. इमारतीच्या तळाला टायटनचंही शोरुम, व्ही. एन ज्वेलर्स, मॅक्स इन्शुरन्स लाईफ यांची कार्यालये आहेत. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.
 
 या इमारतीशेजारी पेट्रोल पंप असल्याने धोका वाढला आहे.  दरम्यान, काल गोरेगाव पूर्वमधील आरएसी इंडस्ट्रिअल इस्टेटमधील कमर्शिअल बिल्डिंगला आग लागली होती. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.