www.24taas.com, मुंबई
आता घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. घर घेताना जो व्हॅट द्यावा लागत होता. तो व्हॅट आता भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच असल्याचे कोर्टानं म्हटल आहे.
व्हॅटप्रकरणी बिल्डरांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. बिल्डरांच्या एमआयसीएचआय या संघटनेनं व्हॅट आकारणीवर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना हायकोर्टानं ही याचिका फेटाळली गेली.
याचिका फेटाळताना बिल्डरांनी २००६ ते २०१० पर्यंतचा पाच टक्के व्हॅट तातडीनं भरावा, असे आदेशही कोर्टानं दिलेत. शिवाय व्हॅट भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच असल्याचे कोर्टानं म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे घर खरेदी करु इच्छिणा-यांचा संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.