मुंबई : स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. याबाबत विधानसभेत तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, पुणे , पिंपरी - चिंचवड, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद या १० शहरांची निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील स्मार्ट सिटीसंदर्भात विधीमंडळात निवेदन दिले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्चाधिकार समितीची नेमण्यात आली होती. या समितीने दहा शहरांची निवड केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.