कुलाबा ते सिप्झ मेट्रो-3चं आज भूमिपूजन!

कुलाबा ते सिप्झ दरम्यान मेट्रो-3चं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मरोळ फायर ब्रिगेडजवळ हा सोहळा दुपारी 3 वाजता होणार आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू या कार्यक्रमाला उपस्थित असतील. 

Updated: Aug 26, 2014, 07:34 AM IST
कुलाबा ते सिप्झ मेट्रो-3चं आज भूमिपूजन! title=

मुंबई: कुलाबा ते सिप्झ दरम्यान मेट्रो-3चं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मरोळ फायर ब्रिगेडजवळ हा सोहळा दुपारी 3 वाजता होणार आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू या कार्यक्रमाला उपस्थित असतील. 

मेट्रो-3च्या कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. अंदाजे 23,000 कोटी रूपये किंमतीचा हा 33 किमी लांबीचा भुयारी प्रकल्प असेल. प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधल्या जागेची निवड करण्यात आलीये. 
 
विधानसभा निवडणूकीसाठीच्या आचारसंहितेचं ‘काऊंटडाऊन’सुरु झाल्यानं मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रकल्पाच्या घोषणा आणि शुभारंभासाठी स्पर्धा लागली आहे.  

देशातील आर्थिक राजधानीमध्ये मोनो, मेट्रो-१सेवा कार्यान्वित झाल्यानंतर दळणवळण श्रेत्रातील मेट्रो-३ हे महत्वपूर्ण प्रकल्प आहे. त्याच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबर अखेरीस प्रारंभ केला जाणार असून यामध्ये एकूण २७ रेल्वे स्थानकापैकी २६ भुयारी स्थानकांचा समावेश आहे. 

मेट्रो-३ च्या निविदाची प्रकिया आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. नियोजित २७ स्थानकामध्ये नरीमन पाईट, बीकेसी, अंधेरी, एमआयडीसी, स्वीप्झ आदी व्यापारी ठिकाणाचा समावेश आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.