राज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित : राज ठाकरे

राज्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.

Updated: Apr 19, 2016, 10:06 PM IST
राज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित : राज ठाकरे title=

मुंबई : राज्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. सरकारची धोरणे चुकल्याने हा परिणाम भोगावा लागत आहेत. याला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारही जबाबदार आहे, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.

राज लातूर एक्सप्रेसने रवाना

राज ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी लातूर एक्सप्रेसने रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांचा दोन वर्षानंतर हा दुष्काळ दौरा करत आहेत. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना भेट देणार आहेत.

दुष्काळाला सरकारची धोरणे कारणीभूत

मराठवाड्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहेत. याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. त्यामुळे हा परिणाम भोगावा लागत आहे, असे राज म्हणालेत. याचबरोबर राज्य सरकारने बांधलेल्या ३३ हजार विहिरी आहेत तरी कोठे याची पाहाणी करणार असल्याचे म्हटले.

किती दिवस असे पाणी देणार

लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविले जात आहे. असे कितीदिवस पाणी देणार आहात. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाय योजना केलेल्या नाहीत, त्यामुळे हे सर्व मानवनिर्मीत दिसत आहे, असे राज ठाकरे म्हणालेत.