इथे खाण्याची ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला बोलावे लागत नाही

मुंबई : एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर वेटरला जोरात आवाज देऊन आपली ऑर्डर देण्याची सवय असते.

Updated: Mar 14, 2016, 02:21 PM IST
इथे खाण्याची ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला बोलावे लागत नाही title=

मुंबई : एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर वेटरला जोरात आवाज देऊन आपली ऑर्डर देण्याची सवय असते. पण, मुंबईच्या पवई भागात 'मिरची अॅण्ड माईम' नावाचे असे एक रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला बोलण्याची गरज नाही. कारण, या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्ती मूकबधीर आहेत. रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डावर इथल्या व्यक्तींशी बोलण्याचे काही किमान संकेत देण्यात आले आहेत. या संकेतांनुसार ग्राहक तेथील वेटर्ससोबत हातवारे करुन आपले खाणे मागवू शकतात. सध्या हे रेस्टॉरंट ग्राहकांच्या भलतेच पसंतीस उतरत आहे. पाहा कसे आहे हे रेस्टॉरंट...