भाजपच्या नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे

 मुंबईत भाजपच्या नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे देण्यात आले. भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथे दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: Mar 8, 2017, 10:03 AM IST
भाजपच्या नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे title=

मुंबई : मुंबईत भाजपच्या नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे देण्यात आले. भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथे दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पालिका प्रशासनाच्या कारभाराचे धडे इथे दिले गेले. महापालिकेत पारदर्शकता कशी आणता येईल याचे धडे नगरसेवकांना देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते.