मुंबईत या आजाराने २ लाख लोकांना ग्रासलंय

मुंबईत २ लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत, राज्यात एकूण १० लाख रुग्ण आहेत. सर्वसाधारणपणे १२ ते २० वयोगटातील मुलांना आणि २१ ते ३० वयोगटातील मुलींना स्किझोफ्रेनिया हा आजार जडतो. 

Updated: May 24, 2016, 03:25 PM IST
मुंबईत या आजाराने २ लाख लोकांना ग्रासलंय title=

मुंबई : मुंबईत २ लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत, राज्यात एकूण १० लाख रुग्ण आहेत. सर्वसाधारणपणे १२ ते २० वयोगटातील मुलांना आणि २१ ते ३० वयोगटातील मुलींना स्किझोफ्रेनिया हा आजार जडतो. 

स्किझोफ्रेनिया हा आजार अनुवांशिक आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळेही होऊ शकतो, तज्ज्ञ डॉक्टरच त्यांच्यावर औषधोपचार करू शकतात.

कॉलेजमध्ये असताना काही विद्यार्थी एकाकी राहतात, कधीकधी स्वत:च्या विश्वात रमलेले दिसतात.

हे बदल त्यांच्यात अचानक झालेले असतात, तरीही या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेकदा स्क्रिझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांवर उपचार होत नाहीत.
 
अनेकदा स्किझोफ्रेनियाची लक्षण आढळूनही कुटुंबातील सदस्य या रुग्णांकडे दुर्लक्ष करतात.