वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर टेम्पोने दोघा पोलिसांना उडविले

 वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाकोल्याजवळ एका भरधाव टेम्पोने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघात दोघे गंभीर जखमी झालेत. 

Updated: Nov 30, 2016, 09:49 AM IST
वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर टेम्पोने दोघा पोलिसांना उडविले title=

मुंबई :  वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाकोल्याजवळ एका भरधाव टेम्पोने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघात दोघे गंभीर जखमी झालेत. 

वाकोला येथे मंगळवारी रात्री उशिरा गस्तीवरील पोलिसांच्या बाइकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही पोलिसांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी बाइकने गस्त घालत असतानाच भरधाव टेम्पोने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही पोलीस बाइकवरून फेकले गेले. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले 

दरम्यान, या अपघाताप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली असून टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर खोपोलीजवळ सकाळी ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.