मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर तोफ डागली आहे, भाजपाने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी हातमिळवणी करुन जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
राष्ट्रहितासाठी कटू निर्णय घ्यावा लागतो म्हणून भाजपाने भारतविरोधी सईद यांच्याशी हातमिळवणी केली, असा टोमणा मारायलाही उद्धव ठाकरे विरसले नाहीत.
जम्मू काश्मीरमधील सत्तास्थापनेविषयी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला फटकारले आहे.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये झाल्याची आठवण करुन देशभक्त मोदींनी काश्मीरप्रश्नी तडजोड करु नये, अशी आशाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
जम्मू काश्मीरमधील निवडणुकीसाठी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना श्रेय देत सईद यांनी सर्वांचा अपमान केला, तसेच अफझल गुरुचे अवशेष मागून पीडीपीने देशद्रोहाचा कळसच गाठला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.