मुंबई : राज्यभर ग्रामीण भागाचा दौरा केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगलीच जाणीव झाली असल्याचं दिसतंय. कारण आज क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे ख्रिस गेलने फटकेबाजी केली, तशी राजकारणात शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी योग्य दिशेला स्ट्रोक हाणून, नरेंद्र मोदी सरकारला भूमी अधिग्रहण कायद्यावर विचार करण्यास भाग पाडलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारला सौम्य पण थेट सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे भूमी अधिग्रहणावर बोलतांना म्हणाले, "शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेत आणलं आहे, त्यांचं गळा घोटण्याचं काम करू नका, भूमीअधिग्रहण कायद्याचा पुनर्विचार करा, उद्योगांना विरोध नाही, पण उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा बळी घेण्यात येत असेल, तर शिवसेनेचा या विधेयकाला विरोध असेल" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
भूमीअधिग्रहण कायद्यात शेतकऱ्यांवर अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत, उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, म्हणून शेतकऱ्यांच्या जगण्याचा, पोटाची खडगी भरण्याचा तुकडा असलेल्या जमिनीलाच थेट नरेंद्र मोदी सरकारने लक्ष्य केलं आहे.
यावर भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेने तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, उद्धव ठाकरे खऱ्या अर्धाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.