उद्धव ठाकरेंची हायटेक अभ्यासप्रणाली... पण, सत्तेत आल्यानंतर!

Updated: Sep 4, 2014, 12:54 PM IST
उद्धव ठाकरेंची हायटेक अभ्यासप्रणाली... पण, सत्तेत आल्यानंतर! title=

मुंबई : मुंबईत नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, त्यांनी सेनेच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'चा पुढचा टप्पा जाहीर केला. यामध्ये, सत्तेत आल्यानंतर ई-प्रबोधन योजना राज्यात लागू करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय. 

पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे :- 
* स्मार्टफोन, टॅबमध्ये शालेय अभ्यासक्रम
* सरकारी शाळेतील मुलांना मोफत टॅब देणार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोलर चार्जर उपलब्ध करून देणार
विद्यार्थ्यांसाठी एसडी कार्डांचा उपक्रम
आठवी ते दहावीचा अभ्यासक्रम 'एसडी कार्ड'मध्ये
शिवसेनेची हायटेक अभ्यासप्रणाली
स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन
टीव्ही, फ्रिज देणार नाही, ते खरेदी करण्याची ताकद देणार - उद्धव
महाराष्ट्र केवळ जाहिरातीत नाही तर प्रत्यक्षात करून दाखवू - उद्धव
सरकार आल्यावर आम्ही या योजना प्रत्यक्षात आणणार - उद्धव
सर्व भाषांत हे उपलब्ध करून देऊ - उद्धव ठाकरे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.