गडबड, बडबड न करता कामातूनच बोलू - शिवसेना

शिवसेनेने आपले सोशल मीडिया कॅम्पियन जोरदार राबविल्याचे सध्या दिसत आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ अप करण्यात आले आहे. सेनेचे नवीन गीत युट्युबवर गाजत आहे. 'शिवसेना, शिवसेना' हे नवीन गीत सेनेतील जोश दाखवून देत आहे. त्याचवेळी गडबड, बडबड न करता कामातूनच बोलू, असे दाखविण्याचा प्रयत्न या गीतातून कऱण्यात आलाय.

Updated: Sep 4, 2014, 08:01 AM IST
गडबड, बडबड न करता कामातूनच बोलू - शिवसेना title=

मुंबई : शिवसेनेने आपले सोशल मीडिया कॅम्पियन जोरदार राबविल्याचे सध्या दिसत आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ अप करण्यात आले आहे. सेनेचे नवीन गीत युट्युबवर गाजत आहे. 'शिवसेना, शिवसेना' हे नवीन गीत सेनेतील जोश दाखवून देत आहे. त्याचवेळी गडबड, बडबड न करता कामातूनच बोलू, असे दाखविण्याचा प्रयत्न या गीतातून कऱण्यात आलाय.

जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. हिंदू हृदयसम्राट पाठिशी, उद्धवजींची कणखर साथ. शिवसेना, शिवसेना शिवसेना. जय भवानी, जय शिवाजी. 
शिवसेना, शिवसेना शिवसेना. हे नवीन गीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाँच करण्यात आलेय. या गीतामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिक, शिवबंधनातील नेतेमंडळी चित्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विकासाचे स्वप्नही दाखविण्यात आले आहे.

या मातीतील आम्ही माणसे, आम्ही ऋण फेडू. प्रश्न मांडणे केवळ नव्हेच, उत्तरही शोधू आम्ही. गडबड, बडबड न करता आम्ही कामातूनच बोलू आम्ही. जे शिल्लक आहे. ते करण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी. धन्युषावरील बाण हा प्रगतीचा. भविष्याकडे जाईल सुसाट, हे सांगण्याचे काम या गाण्यातून करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.