‘...तर सत्ता सोडा’, उद्धव ठाकरेंची तोफ कडाडली

सीएसटी हिंसाचारावरुन राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर सडकून टीका केलीय. ‘सरकार चालवता येत नसेल, तर खाली उतरा’ असा सल्लाच त्यांनी सरकारला दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 13, 2012, 08:41 PM IST

www.24taas.com, मुंबई
सीएसटी हिंसाचारावरुन राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर सडकून टीका केलीय. ‘सरकार चालवता येत नसेल, तर खाली उतरा’ असा सल्लाच त्यांनी सरकारला दिलाय.
‘रझा अकादमीचा इतिहास माहित असतानाही, त्यांना परवानगी दिलीच कशी?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यानिमित्तानं उपस्थित केलाय. ‘शिवसेनेकडून घेता तशी आता रझा अकादमीकडूनही नुकसान भरपा घ्या’, अशी मागणीही त्यांनी केलीय. आसाम हिंसाचाराचे पडसाद मुंबईत उमटतात पण हिंदूंची बाजू घेतली तर तो मात्र धर्मांध ठरतो... आघाडीचं सरकार न्याय देऊ शकणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.

`मार्मिक` साप्ताहिकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वांद्रेतल्या रंगशारदा सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत होते. यानिमित्तानं अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले.