कसाबला भरचौकात फाशी द्या – उद्धव ठाकरे

२६/११ च्या मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या अजमल कसाबला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 29, 2012, 05:03 PM IST

www.24taas.com, मुंबई
२६/११ च्या मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या अजमल कसाबला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय.
२६/११च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवल्यानंतर आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी कसाबला भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. कसाबची फाशीची शिक्षा कायम आहे. पण, ही शिक्षा नेमकी कधी अंमलात येईल, याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे. हाच मुद्दा पकडून कसाब प्रकरणी अफजल गुरुची पुनरावृत्ती नको, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अफजल गुरुला अजून फाशी का मिळाली नाही? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केलाय.
संसदेमध्येही शिवसेना त्वरित फाशीसाठी मागणी करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. फाशी देण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का? असं म्हणत त्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारलाच आव्हान दिलंय. मुंबईतल्या मुसलमानांना देशाचे नागरिक राहण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलंय.