www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर १०० भाजी विक्री केंद्रं राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत.
महाग भाजीपाल्याने मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने स्वस्त दरात भाजीपाला विक्री करणारे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसात ही केंद्र सुरू केली जातील. यासाठी अपना बाजार सारख्या सहकारी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून घाऊक बाजारात भाजी खरेदी करून ती त्याच दरात मुंबईतील या केंद्रांवर विकली जाणार आहे. त्यामुळे सध्या असलेल्या भावापेक्षा ३०टक्के कमी दरात मुंबईकरांना भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
भाजी केंद्र
अपना बाजार- हिंदमाता टॉकीज, नायगाव-दादर, अपना बाजार-सरदार नगर क्रं. १ सायन कोळीवाडा, अपना बाजार-टिळकनगर, चेंबूर, अपना बाजार-आरसीएफ कॉलनी, चेंबूर, अपना बाजार-पंतनगर पोलीस स्टेशन, घाटकोपर, अपना नगर- आझाद नगर, अंधेरी, अपना बाजार-जे एल नेहरू रोड, मुलुंड वेस्ट, सुपारी बाग कंझ्युमर को.ऑ.सोसायटी, लागबाग-परेल, अपना भंडार, शंकरराव चौक, नगरपरिषद शाळा, कल्याण वेस्ट, सहकार बाजार, कळवा ठाणे आदी ठिकाणी स्वस्त भाजी मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.