विसर्जन सोहळ्याला कडेकोट सुरक्षाव्यवस्था

गेले दहा दिवसात राज्यात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळतोय. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर उद्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

Updated: Sep 8, 2014, 06:39 AM IST
विसर्जन सोहळ्याला कडेकोट सुरक्षाव्यवस्था title=

मुंबई : गेले दहा दिवसात राज्यात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळतोय. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर उद्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

बाप्पा उद्या आपल्या गावाला जातील मात्र पुढल्या वर्षी लवकर येण्याचं भक्तांना आश्वासन देऊनच. उद्याचा हाच विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आलीय.

मुंबई, पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह निराळाच असतो. त्यामुळे मुंबई, पुण्यात चोख व्यवस्था करण्यात आलीय. तर पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूकही खास असते.

यासाठी खास मयुरेश्वर रथ तयार करण्यात आलाय. तर जागोजागी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.