`मुंबईत व्होडाफोन बंद होणार नाही`

‘व्होडाफोनचा परवाना आणखी १८ महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवान्याला मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील’ असा दावा मोबाईल कंपनी व्होडाफोननं केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 26, 2013, 11:46 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘व्होडाफोनचा परवाना आणखी १८ महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवान्याला मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील’ असा दावा मोबाईल कंपनी व्होडाफोननं केलाय.
व्होडाफोनच्या परवान्याला मुदतवाढ मिळणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत व्होडाफोननं ग्राहाकांना आपल्याकडे खेचून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईमध्ये व्होडाफोन बंद होणार नाही, असा दावाही यावेळी कंपनीनं केलाय. मुंबईत व्होडाफोनचे ६१ लाख ग्राहक आहेत. आत्तापर्यंत कंपनीनं ५,००० कोटींची गुंतवणूक केलीय. तसंच विविध नव्या योजनांसाठी ४८,००० कोटींची तरतूदही कंपनीनं केलीय.

औद्योगिक कारणांसाठी स्पेक्ट्रमच्या परवनान्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. परवाना नुतनीकरण हा काही फक्त व्होडाफोनशी संबंधित नाही, असं स्पष्टीकरण व्होडाफोनचे लेखासंचालक ललिता अय्यर यांनी दिलंय.