मुंबईकरांसाठी खुशखबर, पाणीकपात होणार रद्द!

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 12, 2012, 05:07 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.
शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी दिलीय. यंदा पावसाचं आगमन उशिरानं झाल्यानं मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट होतं. मात्र गेल्या काही दिवसांत पावसानं दमदार कमबॅक केला. विशेषत: धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडूंब भरलीयत त्यामुळेच पाणीकपातीचा निर्णय झालाय.
मुंबईत सप्टेंबच्या पहिल्या ११ दिवसांत सरासरीपेक्षा ३५ टक्के जास्त पाऊस झालाय. पहिल्या अकरा दिवसांतच ४३९.९ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. त्यामुळं धरणांच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढलीय. मुंबईला वार्षिक १२.५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या धरणांचा पाणीसाठा १२ लाख दशलक्ष लिटर झालाय.