मुंबई : नाशिक जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी गुजरातला वळवण्यावरुन विधानसभेत पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ठिय्या आंदोलन केले.
नाशिकचे पाणी गुजरातला नेण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. सरकारच्या निषेधार्थ छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या वेलमध्ये ठिय्या आंदोलन केलं.
नार-पार आणि पिंजाळ खो-यातल्या पाणी वाटपावर सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भुजबळांनी केली. तर सादरीकरण करून याबाबत गैरसमज दूर केले जातील, असं स्पष्टीकरण जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.