डॉक्टर्स आणि हॉस्पिटलबद्दल माहिती देणारं वेब पोर्टल

एखादा सिनेमा, गाणी, हॉटेल्स यासंदर्भातले रिव्ह्यू म्हणजेच मतं असणारी वेबसाईट आपण नेहमीच पाहतो. पण आता मुंबईतल्या हॉस्पिटल्सचे रिव्ह्यू असणारं एक वेब पोर्टल लॉन्च झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 1, 2013, 11:37 AM IST

www.24taas.com, मुंबई
एखादा सिनेमा, गाणी, हॉटेल्स यासंदर्भातले रिव्ह्यू म्हणजेच मतं असणारी वेबसाईट आपण नेहमीच पाहतो. पण आता मुंबईतल्या हॉस्पिटल्सचे रिव्ह्यू असणारं एक वेब पोर्टल लॉन्च झालंय.
कुटुंबातला एखादा सदस्य आजारी पडल्यावर सगळ्य़ात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे रुग्णाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं. त्यासाठी आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतो. पण आता हे काम आणखी सोपं होणार आहे. कारण त्यासाठी एक वेब पोर्टल तुमच्या मदतीला आलंय.
URL|HOSPITALMIRROR.COM नावाच्या या वेब पोर्टलवर विविध हॉस्पिटल्ससंदर्भात लोकांचे रिव्ह्यू पहायला मिळणार आहेत.

रुग्ण किंवा नातेवाईक एखाद्या हॉस्पिटलनं कशाप्रकारे सेवा दिली, यासंदर्भातली मतं या वेब पोर्टलवर मांडू शकतात. ही सगळू मतं वाचल्यावर कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं, याचा निर्णय घेणं सोपं होणार आहे.
सध्या या वेबपोर्टलवर मुंबईतल्या हॉस्पिटल्सची माहिती आणि रिव्ह्यू उपलब्ध आहेत. लवकरच दिल्लीसह इतर शहरांसाठीही असंच वेब पोर्टल सुरू करण्याचा विचार आहे.