मुंबई : अपघातावेळी सलमान खानच्या कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कमाल खान यांची साक्ष का नोंदवली नाही, अशोक सिंह यांची चौकशी का केली नाही, असे प्रश्न उपस्थित करीत बचावपक्षाकडून पोलिस कर्मचारी रविंद्र पाटील यांच्या जबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
दरम्यान, न्यायालयातील युक्तिवादांमुळे सलमानच्या गाडीमध्ये चौथी व्यक्ती कोण होती याबाबतही संभ्रम निर्माण झाला.
सलमानने याप्रकरणी सेशन कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात अपील केले होते, जामीन अर्जही दाखल केला. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी घेतली. यावेळी सलमान खानचे वकील अमित देसाई यांनी त्याची बाजू मांडली.
सलमानच्या वकिलाचा युक्तीवाद
सेशन कोर्टाने अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले
अशोक सिंह यांच्या साक्षीकडे दुर्लक्ष केले
ताशी ९० किलोमीटर वेगाने गाडी चालली होती
घटनेवेळी गाडीत चार लोक होते
कारचा टायर फाटल्याचा मुद्दा न्यायालयाने ग्राह्य धरला नाही
गाडीत किती जण हे वकील सिद्ध करू शकले नाहीत
रविंद्र पाटील साक्ष देण्यास स्वतःहून इच्छुक नव्हता
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
अपघातावेळी गाडीत तीनच व्यक्ती होत्या
अशोक सिंह हे गाडीमध्ये नव्हतेच
त्यावेळी सलमान खान हा दारुच्या नशेत होता
सलमानच गाडी चालवत होता
इतर मुद्दे
सलमानला शिक्षा देण्याचे कारण न्यायाधीश ठिपसे यांनी विचारले
रविंद्र पाटीलपेक्षा कारमधील लोकांची साक्ष महत्त्वाची
तपासअधिकाऱ्यांनी अशोक सिंह यांची चौकशी का केली नाही?
सलमानच्या गाडीतला चौथा माणूस कोण याबद्दल संभ्रम
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.