मंत्रिमंडळात कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री..

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळात एकनाथ खडसेंच्या जागेवर अधिकृतपणे दुसरे स्थान देण्यात आले आहेत. विधानसभेतही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली आहे. 

Updated: Nov 17, 2016, 07:44 PM IST
मंत्रिमंडळात कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री.. title=

मुंबई : महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळात एकनाथ खडसेंच्या जागेवर अधिकृतपणे दुसरे स्थान देण्यात आले आहेत. विधानसभेतही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली आहे. 

यासंदर्भातला सरकारनं शासन निर्णय जारी केलाय. यापूर्वी पाटील नवव्या स्थानावर होते. आता त्यांनी थेट दुस-या स्थानावर झेप घेतली आहे. यापूर्वीच चंद्रकांत पाटलांची विधानपरिषदेत सभागृह नेते म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

 मंत्रिपदाच्या शपथविधी घेताना खडसेंनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली होती. त्यामुळं त्यांना बढती अपेक्षित होती. मात्र त्यांना डावलून चंद्रकांत पाटलांना बढती देण्यात आल्याची चर्चा रंगू लागलीय. 

ठळक मुद्दे 

- मंत्रीमंडळातील क्रमांक दोनचे स्थान अधिकृतपणे चंद्रकांत पाटील यांच्याकडे 
- विधानसभेतही मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा चंद्रकांत पाटील यांना 
- याआधी विधानसभेत चंद्रकांत पाटील यांचे नववे स्थान होते
- शासनाने आजच जारी केला शासन निर्णय 
- यापूर्वी परिषदेतील सभागृह नेता म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली आहे
- आता मंत्रीमंडळ बैठक आणि विधानसभेतही चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन क्रमांकाचे स्थान