एसटीचा भोंगळ कारभार उघड, ११ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीकडे पाठ

एसटीच्या भोंगळ कारभारामुळं वर्षभरात तब्बल ११ कोटी ३२ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याशिवाय एसटीचा संचित तोटा १ हजार ९३४ कोटींवर पोहचला आहे. मात्र तरीही एसटीची सेवा आणि सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्याचं दिसतं.

Updated: Sep 23, 2015, 10:06 PM IST
एसटीचा भोंगळ कारभार उघड, ११ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीकडे पाठ title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: एसटीच्या भोंगळ कारभारामुळं वर्षभरात तब्बल ११ कोटी ३२ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याशिवाय एसटीचा संचित तोटा १ हजार ९३४ कोटींवर पोहचला आहे. मात्र तरीही एसटीची सेवा आणि सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्याचं दिसतं.

देश स्वतंत्र झाल्यानंतर वर्षभरातच महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सेवेत १ एसटी दाखल झाली. १९४८ सालापासून म्हणजेच मागील ६७ वर्षापासून एसटी अखंड प्रवाशांच्या सेवेत आहे. मात्र आता एसटीला उतरती कळा लागली असून प्रवासी एसटीकडे पाठ फिरवू लागले आहेत. माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात ११ कोटी ३२ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.

- २०१३-१४ मध्ये एसटी प्रवाशांची संख्या होती २५६ कोटी ६० लाख ६५ हजार
- यात ११ कोटी ३२ लाख प्रवाशांची घट 
- २०१४-२०१५ यावर्षी प्रवासी संख्या २४५ कोटी ६० लाख ३३ हजार 

एसटी महामंडळाचा गलथान आणि भोंगळ कारभार याला प्रामुख्यानं जबाबदार आहे.

- एसटी चालक आणि वाहकांची प्रवाशांशी उर्मट वागणूक
- एसटी गाड्यांची दुर्दशा
- रस्त्यात एसटी वारंवार नादुरुस्त होऊन प्रवाशांना मनस्ताप
- प्रवाशांच्या सोयीनुसार सेवा नाही
- एसटीपेक्षा चांगल्या खाजगी वाहतुकीचा पर्याय
- हात दाखवा गाडी थांबवा योजनेला चालकांकडून तिलांजली
- वेळेत गाड्या न सुटणं
- एसटी आगारांमध्ये अस्वच्छता आणि आगारांची दुरावस्था
 
अशा अनेक कारणांमुळं प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.
 
एसटीच्या केवळ प्रवासी संख्येत घट झालेली नाही, तर एसटीचा संचित तोटा १ हजार ९३४ कोटींवर पोहचला आहे. २०१४-१५ मध्ये प्रति किलोमीटर एसटीला २७ रुपये ५७ पैसे कमाई होत होती, तर खर्च कमाईच्या तुलनेत ३६ रुपये ८५ पैसे इतका होता. म्हणजे आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपया असा प्रकार एसटीत सुरू आहे. सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं मागील अऩेक वर्ष सुरू असलेला हा कारभार असाच सुरू आहे.

पाहा व्हिडिओ - कोकणवासियांना एसटीचा आधार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.