मुंबई : घटस्फोटासंदर्भात आलेल्या कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य होते. असेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे. वांद्रेच्या एका फॅमिली कोर्टाने एका तीस वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नील घटस्फोट देण्यास मंजुरी दिली आहे.
या संदर्भात आलेल्या बातम्यांनुसार त्या व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी एका गुरूच्या सांगण्यावरून त्याच्याशी शारिरीक संबंध बनवत नव्हती. तसेच पती आपल्याला अनैसर्गिक सेक्स करण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे ती पतीसोबत शारिरीक संबंध बनवत नव्हती, हा पत्नीचा दावा कोर्टाने फेटाळला.
या दोघांचे लग्न २०११मध्ये झाले. आपल्या याचिकेत पतीने म्हटले की लग्नाच्या रात्री त्याच्या पत्नीला कंडोमचे पॅकेट गिफ्ट म्हणून भेटले. त्यावेळेस मी ते सामान्यपणे घेतले. पण लग्नाच्या चार महिन्यानंतर अडचणी वाढल्या. पुढील पाच वर्ष मुल होऊ न देण्याची पत्नीने योजना असल्याचे सांगितले. पतीने आपल्या अर्जात सांगितले की, गुरूच्या सांगण्यावरून पत्नी त्याच्याशी सेक्स करत नव्हती.
पतीला घटस्फोटाची मंजूरी देताना न्यायाधिश मोरे यांनी सांगितले की, व्यक्तीचा आरोप आहे की पत्नी त्याला सेक्ससाठी छळते, हा दावा योग्य आहे यात काही वाद नाही. पत्नीकडे पतीशी सेक्स न करण्याचे समाधानकारक कारण नाही आहे. त्यामुळे पत्नीचे हे कृत्य मानसिक क्रूरता आहे. तसेच पतीने आपल्या अर्जात अनेक आरोप लावेल आहेत. त्यात पत्नी अनेकांशी भांडत होती. तसेच ऑफीसमध्ये फोन करून त्याचा मानसिक छळ करत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.