मुंबई: सलमान खानच्या गाडीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अब्दुल्ला शेख यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. सलमानला शिक्षा होऊ नये, असं त्यांनी सांगितलं आहे.
सलमानला शिक्षा होते की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतांना अपघातग्रस्त अब्दुल्लाने केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. माझ्यासोबत जे झालं, ते झालं. त्यामुळे आता सलमानला शिक्षा नको, असं त्यांनी सांगितले आहे.
विषेश म्हणजे न्यायालयाकडून त्यांना फक्त १ लाख ८० रुपये मिळाले आहेत. त्यांना आणखी मदतीची अपेक्षा आहे. सलमानला शिक्षा झाल्याने माझा पाय बरा होणार नाही. असं त्यांनी सांगितले.
सलमानला शिक्षा होऊ नये, तसेच आमचं आयुष्यही सुखानं जावं अशी आशा अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.