मुंबई : मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली.
मंगळवारी ही शाळा तोडण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक पोलीस फौजफाट्यासह दाखल झालं. कुशाभाऊ बांगर शाळेच्या विद्यार्थी आणि पालकांनी मात्र या तोडक कारवाईला मोठा विरोध केला. त्यामुळे काल हे पथक परत गेलं.
आज पुन्हा 11 वाजण्याच्या सुमारास हे पथक तोडकारवाईसाठी दाखल झालं. आज, मात्र मनसे या शाळेच्या संरक्षणासाठी सरसावली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर मंगेश सांगळे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या मध्यस्तीमुळे ही शाळा वाचली.
महापालिकेच्या कारवाई विरोधात शाळेतर्फे उच्च न्यायालयात दाद मागण्यात आलीय. त्यामुळे ही कारवाई रोखण्यात आलीय.
कारवाई थांबल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर येऊन जल्लोष केला. 'झी मीडिया'ने सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे कारवाई टळली असं सांगत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.