मुंबई: राणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत की काय....? असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणेंचे पुत्रे निलेश राणे यांनी हिंदुत्वाचा नारा धरलाय.
ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत जे घडलं, ते जवळपास सगळ्या जगभरात घडतंय, त्यामुळं भारतानं जास्ती जास्त लोकांना हिंदू धर्मात धर्मांतर करण्यावर भर द्यावा, असं ट्विट निलेश राणे यांनी केलंय.
लवकरच हिंदूंना एकत्र आणण्यासाठी हिंदू फोरमची स्थापना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
ऐका काय म्हणालेत राणे -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.