अबब!!! अनैतिक संबंधातून एवढ्या हत्या?

एकतर्फी प्रेम आणि अनैतिक संबंध यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले आहे. त्यामुळे यातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणहूी वाढत गेले आहेत. गेल्या वर्षी २०११ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ३०५ हत्या झाल्याची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने दिली आहे.

Updated: Aug 8, 2012, 11:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

एकतर्फी प्रेम आणि अनैतिक संबंध यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले आहे. त्यामुळे यातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणहूी वाढत गेले आहेत. गेल्या वर्षी २०११ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ३०५ हत्या झाल्याची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने दिली आहे. आणि यातील जास्तीत जास्त हत्या ह्या अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे.  प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते असे बोलले जाते. प्रेमाच्या नावाखाली असे अक्षम्य प्रकार सर्रास चालू असतात.

 

शहरातील जीवन ताणतणावाचे असते. प्रत्येकजण जगण्यासाठी संघर्ष करीत असतो. दारिद्य्र आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांमधून माणूस पिचलेला असतो. त्यातून प्रेमभंगातील अपयश पचविणे अवघड जाते. त्यातून अशा घटना अलीकडे वाढल्या असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रेम प्रकरणाच्या खालोखाल पूर्ववैमनस्यातून २०१ जणांच्या हत्या झाल्याचे आकडेवारी सांगते. देशात इतरत्र पूर्ववैमनस्यातून सर्वाधिक हत्या झाल्याचे समोर आले आहे तर दुसर्‍या क्रमांकावर प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येचा समावेश आहे.

 

मालमत्तेच्या वादातून १४७ जणांचा जीव गेला आहे तर हुंडाबळीतून ११३ जणांचा बळी गेला आहे. तर बदला, दहशतवाद किंवा कट्टरवाद हीसुद्धा एखाद्याचा खून करण्यामागची मुख्य कारणे आहेत. गेल्या वर्षी २०११ मध्ये महाराष्ट्रात एकूण २,८१८ खुनाचे गुन्हे नोंदले गेले. त्यातून १,९१६ खुनांमागे इतर वेगळी कारणे असल्याचे उघड झाले आहे.