आज मध्यरात्री विशेष रेल्वेसेवा

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मध्यरात्री होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेने उशिरापर्यंत विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री १.१० ते रात्री २.४० वाजता या गाड्या धावणार आहेत.

Updated: Dec 31, 2011, 12:26 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मध्यरात्री होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेने उशिरापर्यंत विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री १.१० ते रात्री २.४० वाजता या गाड्या धावणार आहेत.

सीएसटी-पनवेल विशेष लोकल रात्री १.२० वाजता सुटणार असून ती पनवेलला रात्री २.४० वाजता पोहोचेल. पनवेल-सीएसटी विशेष लोकल रात्री १.२० वाजता सुटणार असून ती सीएसटीला रात्री २.४० वाजता पोहोचेल. मध्य रेल्वेतर्फे सीएसटी-कल्याण लोकल मध्यरात्री १.१० वाजता सुटणार असून ती कल्याणला रात्री २.४० वाजता पोहोचेल. तसेच, कल्याण-सीएसटी ही लोकल कल्याण स्टेशनवरून मध्यरात्री १.१५ वाजता सुटणार असून ती सीएसटीला रात्री २.४५ वाजता पोहोचेल.

पश्चिम रेल्वेने यापूर्वीच दोन लोकल उपलब्ध केल्या आहेत. तर चर्चगेट-विरार लोकल चर्चगेटवरून रात्री ३.१५ वाजता सुटणार असून विरारला पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल. विरार-चर्चगेट लोकल विरारवरून रात्री २ वाजता सुटणार असून चर्चगेटला पहाटे ३.४० वाजता पोहोचणार आहे. या सर्व लोकल प्रत्येक स्टेशनवर थांबणार आहेत.