उमेदवारी न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

उमेदवारी मिळाली नाही म्हणून, शिवसेनेच्या एका महिला पदाधिका-याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. शिवसेनेच्या महिला उपविभाग संघटक अस्मिता सावंत यांनी संध्याकाळी आपल्या आंबोली येथील राहात्या घरी झोपेच्या गोळय़ा घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Updated: Feb 3, 2012, 08:25 AM IST

www.24taas.com, मुंबई

उमेदवारी मिळाली नाही म्हणून, शिवसेनेच्या एका महिला पदाधिका-याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. शिवसेनेच्या महिला उपविभाग संघटक अस्मिता सावंत यांनी संध्याकाळी आपल्या आंबोली येथील राहात्या घरी झोपेच्या गोळय़ा घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

सावंत या शहाराजीराजे क्रीडा संकुल वॉर्ड क्रमांक ५८ मधून शिवसेनेतर्फे इच्छुक होत्या. मात्र तेथे ज्योती सुतार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सावंत कमालीच्या नाराज झाल्या आणि गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अस्मिता सावंत यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी हॉस्पिटलला भेट देऊन अस्मिता सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.    नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

[jwplayer mediaid="40867"]