www.24taas.com, मुंबई
टिळक भवनमध्ये जिल्हा आणि ब्लॉक समितीच्या सदस्यांनी राहुल गांधींसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. तेच तेच मंत्री मंत्रिमंडळात आहेत, इतरांना संधी कधी मिळणार, महामंडळाच्या नियुक्त्या केल्या जात नाहीत.
पदं कधी मिळणार, एनसीपीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, काँग्रेस कार्यकर्त्यांची कधी होणार, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. आघआडीचा फायदा फक्त राष्ट्रवादीलाच होतो आहे.
त्यामुळे राज्यात स्वतंत्र निवडणुका लढवण्याची वेळ आल्याचं गाऱ्हाणं राहुल यांच्यापुढं मांडण्यात आलं. या काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. आपल्या पक्षाकडे बघा, दुसऱ्या पक्षांकडे नको, असं त्यांनी म्हटलं.