क्रॉफर्ड मार्केटमधील आगीचा संशयाचा धूर

क्रॉफर्ड मार्केट परिसरात लागलेली भीषण आग ही संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेथील काही व्यापाऱ्यांनीही तसा संशय व्यक्त केला.

Updated: Nov 27, 2011, 05:45 AM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम हाच मुंबईतील  'सारा-सहारा' मॉलचा मालक असल्याच्या चर्चेचा धूर पसरला आहे.  क्रॉफर्ड मार्केट परिसरात लागलेली भीषण आग ही  संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेथील काही व्यापाऱ्यांनीही तसा संशय व्यक्त केला.

 

क्रॉफर्ड मार्केट परिसरात लागलेली भीषण आग अटोक्यात आणण्यात अखेर यश आलयं. मात्र या आगीत कोट्यवधी रूपयांचं नुकसान झालयं. पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागली होती. या  आगीत सारा सहारा मार्केट, मोटा मार्केट आणि मनिष मार्केट जळून खाक झालयं. सारा सहारा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदा आग लागल्याचं सांगण्यात येतय. आग इतकी भीषण होती की ती  शेजारच्या मनीष मार्केटमध्येही पसरली. मुंबईतलं सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं मार्केट असलेल्या मनिष मार्केटमध्येही आग पसरल्यानं याठिकाणच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं.

 

आगीची माहिती मिळाल्यानंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न  केले अखेर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलयं. मात्र ही आग कशामुळं लागली याचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. परंतु या आगीला  फायर ब्रिगेडला काहींनी जबाबदार धरलं आहे. गाड्या वेऴेत पोहोचल्या नसल्याने आगीचा भडका उडाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
'सारा-सहारा' मॉल दाऊदचा भाऊ इक्बा्ल कासकर याने महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी इक्बातल कासकर, त्याचा एक साथीदार; तसेच महापालिकेचा तत्कालीन सहायक आयुक्त आणि पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या प्रकरणातून इक्बापलची सुटका झाली. त्यानंतर या मार्केटवर महापालिकेचा हातोडा पडला; पण त्या जागेवर लहान लहान दुकाने पुन्हा उभी राहिली. या परिसराच्या विकासाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आग लागल्यामुळे संशयाचा धूर उसळला आहे. ही आग जाणून-बुजून लावण्यात आल्याचा आरोप काही व्यापारी करीत आहेत.

 

अग्निशमन दल आणि महापालिकेत समन्वय नसल्याचा आरोपही त्यांनी केला. रात्री आग लागल्याचे समजल्यानंतर आम्ही येथे आलो, तेव्हा केवळ'सारा-सहारा' मॉललाच आग लागली होती; पण पुढील दीड तासातच ही आग मनीष मार्केटपर्यंत पसरली. त्यामुळे या आगीमागे कोणाचा तरी कट असल्याचा संशय वाटतो, असे व्यापारी अस्लम मल्कानी म्हणाले.