प. रेल्वेचा 'मेगाब्लॉक', प्रवासी मात्र 'ब्लॉक'

आज पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी वेठीला धरले जाणार आहेत. मेगाब्लॉकमुळे बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. डीसी विद्युत कर्षणाचे एसी विद्युत कर्षणामध्ये रुपांतरण करण्यासाठी पश्चिम रेल्वे आज मेगा ब्लॉक घेणार आहे.

Updated: Nov 13, 2011, 04:39 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आज पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी वेठीला धरले जाणार आहेत. मेगाब्लॉकमुळे बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे.  डीसी विद्युत कर्षणाचे एसी विद्युत कर्षणामध्ये रुपांतरण करण्यासाठी पश्चिम रेल्वे आज मेगा ब्लॉक घेणार आहे. हा मेगा ब्लॉक बांद्रा ते भाईंदरमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेचारवाजेपर्यंत असा सहा तासांसाठी मेगाब्लॉक राहणार आहे.

 

बोरीविली ते विलेपार्ले या खंडावर हे रुपांतरणाचे काम करण्यात येणार असल्याने, बांद्रा ते भाईंदरदरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रमुख स्थानकांवरून बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. बेस्टनं 150 जादा बसेस सोडण्यात आलेत.