www.24taas.com, मुंबई
एका महिलेवर सतत सात महिने बलात्कार करण्याचा आरोप असलेला सहायक पोलीस आयुक्त अनिल महाबोले याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, बुधवारी ही माहिती दिली. महाबोले याच्याविरुद्ध मंगळवारी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.
एसीपी महाबोले यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचेही आरोप लावण्यात आले आहेत. महाबोले यांची खातेअंतर्गत चौकशीही झाली आहे. पत्रकार जे डे मर्डर केसमध्येही अनिल महाबोले यांची चौकशी करण्यात आली होती. महाबोले आणि जे डे यांच्यात वाद असल्याचं सांगण्यात येत होतं, पण चौकशीत काहीही सिद्ध होऊ शकलं नाही.
विनोबा भावे नगर येथील रहिवासी एका महिलेने गेल्या आठवड्यात सह-पोलीस आयुक्त रजनीश सेठ यांच्याकडे महाबोलेविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. या महिलेचा पती घरात नसताना महाबोले तिच्याकडे गेला. त्यानंतर त्याने तिला अंमली पदार्थ मिसळलेला लाडू खायला दिला. त्यानंतर महाबोलेने तिच्यावर बलात्कार करून एमएमएस तयार केला होता. या एमएमएसद्वारे महाबोले तिला ब्लॅकमेल करत होता.