www.24taas.com, मुंबई
बिहार दिनाचे बिहार दिनाचे आयोजक राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. देवेश ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या भेटीत बिहार दिनाबाबतचा वाद संपण्याची विनंती देवेश ठाकूर राज ठाकरेंना करण्याची शक्यता आहे.
आयोजक राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. देवेश ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या भेटीत बिहार दिनाबाबतचा वाद संपण्याची विनंती देवेश ठाकूर राज ठाकरेंना करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत मुंबईत येणारच, असं प्रत्त्युत्तर नितीश कुमारांनी राज ठाकरेंना दिलंय. मुंबईत घाटकोपरमध्ये 15 तारखेला बिहार दिनाचा कार्यक्रम होतोय. मला मुंबईत यायला व्हिसा लागत नाही, असं नितीश कुमारांनी म्हंटलं होतं. त्यावर मुंबईत येऊन बिहार दिन साजरा करुन दाखवाच, असं आव्हान राज ठाकरेंनी नितीश कुमारांना दिलं होतं. त्यावर मी मुंबईत येऊन बिहार दिन साजरा करणारच, असं प्रत्युत्तर नितीश कुमार यांनी दिलंय.
आज सकाळी राज ठाकरेंनी नितीश कुमारांना दिलेल्या आव्हानानंतर मुंबईत गृहविभागाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी बिहार दिनासंदर्भातच सुरू असलेली बैठक थोड्याच वेळापूर्वी संपली. बिहार दिनाबद्दल रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीला मनसे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रविवारी 15 तारखेला घाटकोपरमध्ये सोमय्या मैदानावर बिहार दिनाचा कार्यक्रम साजरा होतोय. बिहार शताब्दी वर्ष निमित्तानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलंय.