www.24taas.com, मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून सतत लांबणीवर पडणारा बेस्ट बस भाडेवाढीचा प्रस्ताव कालच्या बेस्ट समितीच्या बैठकीतही लांबणीवर पडला. त्यामुळे तूर्तास तरी बेस्ट भाडेवाढीचं संकट टळल आहे.
प्रस्तावित भाडेवाढीचा प्रस्ताव बेस्ट समिती सदस्यांना अभ्यासासाठी सादर करण्यात आला असून त्यावर पुढिल बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याआधी महापालिकेच्या निवडणुकीचा विचार करून सर्वच समिती सदस्यांनी भाडेवाढ फेटाळली होती. त्यानंतर बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. ३१९ कोटी रुपयांचा तोटा भरुन काढण्यासाठी बेस्ट बसभाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात येतंय. मात्र कालच्या बैठकीतही हा प्रस्ताव लांबणीवर पडल्यानं प्रवाशांना सध्या तरी बेस्ट भाडेवाढीचा बोजा सहन करावा लागणार नाही.
बेस्ट दरवाढीची कु-हाड कोसळण्याची शक्यता होती. पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठवडा उलटण्याच्या आत बेस्ट बसच्या भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचा प्रस्ताव होता.
आणखी संबंधित बातमी
मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढीचा बोजा