www.24taas.com, मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, महापालिका निवडणूकांच्या तारखा आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येईल. तर त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आहे, त्यामुळे मुंबईत पालिका निवडणूकीचे पडघम आता वाजू लागले आहेत, आणि निवडणूकीचे वातावरण रंगू लागलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीची आचारसंहीता आजपासून लागू होण्याची शक्यता आहे. तर पालिका निवडणुकांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होईल आणि १७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणम यांची आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आहे.
या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहीता लागू झाल्यास पालिकेतील नगरसेवकांच्या गाड्या काढून घेतल्या जातील. तसेच पालिकेकडून कोणताही जाहीर कार्यक्रम घेता येणार नाही तसेच स्थायी समितीच्या बैठकांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय लागू होणार नाहीत.