मुंबईत रिक्षाभाडेवाढीची अमंलबजावणी

परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली होती. या भाडेवाढीची आजपासून अमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे किमान भाडे आता १२ रूपये झाले आहे.

Updated: Apr 20, 2012, 12:10 PM IST

www.24taas.com, मुंबई
परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली होती.  या भाडेवाढीची आजपासून अमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे किमान भाडे आता १२ रूपये झाले आहे.

 

 

दरम्यान, रिक्षाची भाडेवाढ करूनही संप केला तर  संपकरी रिक्षाचालकांचे परमिट रद्द करू, असा गंभीर इशारा परिवहन सचिव शैलेश शर्मा यांनी रिक्षाचालकांना दिला होता. त्यानंतर एक दिवसाचा लाक्षणिक संप करून रिक्षाचालकांनी आपला निषेध व्यक्त केला. मात्र, रिक्षासाठी पहिल्या टप्प्यासाठी १ रुपयाची वाढ देण्यात आली. दुसर्‍या टप्प्यासाठी अलीकडेच ५0 पैशांची वाढ दिली गेली असल्याने या टप्प्यासाठी भाडेवाढ टळली असल्याचे सांगण्यात आले होते. संपकरी रिक्षाचालकांना परिवहन विभागाने परवाने रद्दबरोबर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एक दिवसाचा संपावरच  रिक्षाचालकांना समाधान मानावे लागले.

 

 

टॅक्सीदरवाढीसंदर्भात १९९६ साली नेमलेली पीएमए हकीम यांच्या अध्यक्षतेखालील समिती कालबाह्य झाल्याची तक्रार टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीदरवाढीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

व्हिडिओ पाहा...

 

[jwplayer mediaid="86339"]