मोठी बातमी, सलमान खान धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अटक

सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला कर्नाटकातून अटक करण्यात आली असून तो स्वत: ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचं सांगत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 7, 2024, 12:38 PM IST
मोठी बातमी, सलमान खान धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अटक  title=

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. धमक्यांसोबतच त्याला 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाकडे सलमान खानला जीवे मारण्याचा मेसेज आला होता. याची माहिती पोलिसांनी सोमवारी रात्री दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

दरम्यान, सलमान खानला धमकी देणारा आणि खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपी बिकाराम जलाराम बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करत आहे. राजस्थानमधील जालौर येथील हा रहिवाशी आहे. 

भीकारामला कसं घेतलं ताब्यात?

भीकाराम जलाराम बिश्नोई हा राजस्थानमधील जालौर येथील रहिवाशी आहे. तो त्याच्या काही कामासाठी नुकताच हावेरीत आला होता. त्यामुळे भीकाराम हा तिथेच एका मजुरांच्या खोलीत राहत होता. तो त्याच्या कामासाठी हावेरी येथे गेला असता त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांना भीकाराम हा हावेरीत काम करत असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, तो नेमकं कुठे काम करतो हे पोलिसांना माहिती नव्हते. कारण तो नेहमी आपला फोन बंद करून ठेवत होता. परंतु, जेव्हा भीकारामने त्याचा फोन चालू केला त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. 

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. धमक्यांनंतर सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. परंतु, त्यानंतर देखील सलमान खानला धमक्या येत आहेत. अशातच पोलिसांनी एका आरोपीला कर्नाटकातून अटक केली आहे. हा आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करत आहे. जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत. जर सलमान खानने असे केले नाही तर त्याला मारून टाकू. आमची टोळी अजूनही सक्रिय असल्याचं देखील अनेक वेळा सलमान खानला येणाऱ्या धमक्यांमध्ये म्हटलं आहे.