मुंबईसह राज्यात थंडीची लाट

मुंबई-पुण्यासह राज्यभर थंडीचा कडाका, नाशिकमध्ये दवबिंदू गोठले, तर निफाडमध्ये पारा शुन्यावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडीची लाट पसरली आहे. गेल्या २० ते २५ वर्षातील सर्वात कमी तापमानची नोंद झालीय. त्यामुळे मुंबईकर जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बजाव करताहेत.

Updated: Feb 9, 2012, 11:24 AM IST

www.24taas.com, मुंबई/नाशिक

मुंबई-पुण्यासह राज्यभर थंडीचा कडाका, नाशिकमध्ये दवबिंदू गोठले, तर निफाडमध्ये पारा शुन्यावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडीची लाट पसरली आहे. गेल्या २० ते २५ वर्षातील सर्वात कमी तापमानची नोंद झालीय. त्यामुळे मुंबईकर जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बजाव करताहेत.

थंडीच्या लाटेनं राज्याला भरली हुडहुडी, निफाड परिसरात दवबिंदू गोठले, नाशिकमध्ये २.७ वर तर पुण्यात ४.६ अंशांवर पारा घसरला, मुंबईलाही कापरं भरलं आहे. मुंबईतील तापमान  १२ डिग्रीपेक्षा खाली उतरलं होतं.  तर नाशिकमध्ये तापमान २.७ अंशांपर्यंत घसरलंय. तर जिल्ह्यातल्या निफाडच्या गहू संशोधन केंद्रात ०.२पर्यंत पारा घसरलाय.   मुंबईचे तापमानही ८.८ अंशांपर्यंत खाली घसलंय. उतरलं होतं.

नाशिकमध्ये तापमान २.७अंशांपर्यंत घसरलंय. तर जिल्ह्यातल्या निफाडच्या गहू संशोधन केंद्रात ०.२ पर्यंत पारा घसरलाय. दोन हजार सालापासून यंदा सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आलंय. उत्तर भारतातल्या शीत लहरींमुळे नाशिक शहरही गारठलंय. अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम शाळा,कॉलेज आणि जॉगिंग टॅकच्या उपस्थितीवरही जाणवतेय. या बोच-या थंडीमुळे नाशिककरांचे व्यवहारही उशिरानं सुरू होत आहेत.

नाशिक शहराचं कालचं तापमान ८.४ अंश सेल्सिअस इतकं होतं. मात्र एका दिवसात नाशिकचं तापमान जवळपास ६ अंशानं म्हणजेच २.७ इतकं नोंदविण्यात आलं. पुढील दोन दिवस असंच कमी तापमान कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

[jwplayer mediaid="44579"]