www.24taas.com, मुंबई
केवळ दुकानांवरील मराठी पाट्या मराठीत लिहून भाषा टिकवता येत नाही, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज शिवसेना आणि मनसेला लगावला.
जागतिक मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते, ते म्हणाले, दुकानावर मराठी पाट्या लावून काही मराठी भाषा टिकवता येणार नाही. मराठी आपली जीवनशैली झाली पाहिजे, मराठी हा आपला श्वास बनला पाहिजे, प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.
सर्वांनी मनाची पाटी कोरी करून मराठीकडे नव्या विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केले.