www.24taas.com, मुंबई
आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. त्यात उकाड्याने हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी घामाच्या धारांनी चिंब भिजलेल्याने अधिकच हैराण झाले होते.
मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 10 वाजून 35 मिनीटांपासून दुपारी 3 वाजून 35 मिनीटांपर्यंत डाऊन फास्ट मार्गावर माटूंगा ते मलुंड स्टेशन दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. या वेळेत सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व फास्ट गाड्या माटूंगा ते मुलुंडदरम्यान स्लो लाईनवर वळवण्यात येतील. या गाड्या सायन ते मुलूंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.... हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत सीएसटी ते मानखुर्द तसंच ठाणे ते पनवेल दरम्यान विशेष गाड्या धावतील. हार्बर लाईनच्या प्रवाश्यांना ब्लॉक कालावधीत त्यांच्या वॅलीड कार्ड किंवा सिझन तिकीटावर ट्रान्सहर्बर आणि मेन लाईनवरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.... तसंच पश्चिम रेल्वे मार्गावरही 11 ते 4 पर्यंत मुंबई सेंट्रल ते सांताक्रूज दरम्यान डाऊन स्लो लाईनवर मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत स्लो लाईनवरुन धावणाऱ्या सर्व डाऊन लोकल्स मुंबई सेंट्रल ते सांताक्रूज दरम्यान फास्ट लाईनवरुन धावतील. या गाड्या महालक्ष्मी, एल्फीन्स्टन रोड आणि माटुंगा रोड या स्थानकांवर थांबणार नाहीत.