युतीत कुठलाही विसंवाद नाही - मुंडे

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेत नाही. तसेच कोणताही विसंबाद नसल्याची माहिती भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. तर आमच्यात कोणतेही मदभेद नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

Updated: Feb 25, 2012, 05:05 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेत नाही. तसेच कोणताही विसंबाद नसल्याची माहिती भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. तर आमच्यात कोणतेही मदभेद नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

 

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मातोश्रीवर केलेले फोन डायव्हर्ड केले जातात आणि सामनातून होणाऱ्या टीकेवर झोड उठविल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचे बातावरण होते.  गडकरी आणि शिवसेना यांच्यातल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.  त्यानंतर मुंडे आणि राऊन मीडीयाशी बोलत होते.

 

 

उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीनंतर नितीन गडकरी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती गोपीनाथ मुंडे यांनी दिली. युतीमध्ये कुठलाही विसंवाद नाही असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं. नाशिकच्या महापौरपदाबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचं सांगत फक्त भाजप शिवसेनेची स्ट्रटर्जी काय असेल एवढीच चर्चा झाली. इतर कोण्त्याही पक्षाबाबत चर्चा झाली नसल्याची माहितीही मुंडे यांनी दिलीय. दरम्यान या चर्चेनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. तसच आपल्याबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी म्हंटल आहे.

 

 

व्हिडिओ पाहा..

 

ठाकरे भेटीनंतर गोपीनाथ मुंडे

[jwplayer mediaid="55185"]

 

संजय राऊत काय म्हणालेत

[jwplayer mediaid="55209"]