राज ठाकरेंची भाषणं आता पुस्तकात!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर गेल्या सहा वर्षात मराठी माणसाच्या प्रश्नांविषयी भाषणांतून मांडलेली भूमिका आता पुस्तकरुपाने येणार आहे.

Updated: Dec 1, 2011, 02:38 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर गेल्या सहा वर्षात मराठी माणसाच्या प्रश्नांविषयी भाषणांतून मांडलेली भूमिका आता पुस्तकरुपाने येणार आहे. ‘ही राजभाषा असे ’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात महाराष्ट्र धर्म या साहित्य महोत्सवात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे.

 

यावेळी ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत.
नवता ग्रंथविश्वद्वारे प्रकाशित करण्यात येत असलेल्या या पुस्तकात राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा संग्रह आहे. राज ठाकरे यांच्या निवडक जाहीर सभांचे छायाचित्रे यात समाविष्ट करण्यात आलेली आहे.

Tags: