www.24taas.com, मुंबई
महापौरपदांची सोडत जाहीर झालीय. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या ठाण्याचं ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. त्यामुळे ठाण्यात ओबीसी महापौर होणार आहे.
तर नाशिकमध्येही खुल्या प्रवर्गाचं आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. त्यामुळे नाशिकमध्ये खुल्या गटातला महापौर होणार आहे. नवी मुंबई, वसई विरारसाठी ओबीसीचं आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. तर कल्याण डोंबिवलीसाठी ओबीसी महिलेसाठी राखीव आहे.
मीरा भाईंदर आणि नांदेड वाघाळा महापालिकांसाठी खुल्या प्रवर्गाचं आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. तर भिवंडी आणि धुळे महिलांसाठी राखीव झालंय.
ठाणे - ओबीसी (कायम)
नाशिक - खुला प्रवर्ग (कायम)
भिवंडी - महिला
धुळे - महिला
नवी मुंबई - ओबीसी (कायम)
वसई विरार - ओबीसी (कायम)
कल्याण डोंबिवली - ओबीसी महिला
मीरा भाईंदर - खुला प्रवर्ग (कायम)
नांदेड-वाघाळा - खुला प्रवर्ग (कायम)
भिवंडी आणि धुळे महापौरपद महिलांसाठी आरक्षित झालंय. तर कल्याण डोंबिवलीचं महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव झालंय. नवी मुंबईच्या आरक्षणात बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवी मुंबईत ओबीसी महिलाच महापौर राहणार आहे.