राष्ट्रवादीच्या या 'आशा' जिल्हाध्यक्ष !

इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानी युवकाशी लग्न केलेली आशा पाटील पतीच्या मृत्युनंतर ती भारतात परतली होती. त्यानंतर तिची राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता जुगार खेळतांना रंगेहाथ पकडली गेल्यामुळे आशा पाटील पुन्हा चर्चेत आली आहे.

Updated: Oct 5, 2011, 07:49 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मुंबईत जुगार खेळणाऱ्या मीरा भाईंदरच्या  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला रंगेहाथ अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीच्या युवा महिला जिल्हाध्याक्षही मागे राहिल्या नाहीत. रुपेश रेडकर यांच्यासह आशा पाटीललाही काशीमीरा  पोलिसांनी अटक केलीय. राष्ट्रवादीच्या या दोघा महारथींसह इतरही 50 जणांना पोलिसांनी गजाआड केलंय. हे सर्वजण दहिसर चेक नाक्याजवळील लक्ष्मी लॉजवर जुगार खेळत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर काशीमीरा पोलिसांनी सापळा रचून छापा मारला आणि या सर्वांना रंगेहाथ अटक करण्यात आलीय.  आशा पाटीलनं इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या युवकाशी लग्न केलं होतं. त्यानंतर ती चर्चेत आली होती. मात्र पतीच्या मृत्युनंतर ती भारतात परतली होती. त्यानंतर तिची राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता जुगार खेळतांना रंगेहाथ पकडली गेल्यामुळे आशा पाटील पुन्हा चर्चेत आली आहे. रुपेश आणि आशा यांच्या नेतृत्वातच हा जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याचं बोललं जातंय. अटक झालेल्या सर्वांकडून दोन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Tags: