शाहरूखवर पाच वर्षांसाठी बंदी

वानखेडे स्टेडिअमवर गुरुवारी रात्री घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी शाहरूख खान याच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोशिएशनने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी दिली.

Updated: May 18, 2012, 12:35 PM IST

www.24taas.com,मुंबई

 

वानखेडे स्टेडिअमवर गुरुवारी रात्री घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी शाहरूख खान याच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोशिएशनने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी दिली.

 

वानखेडे स्टेडिअमवर गुरुवारी रात्री घडलेला प्रकार गंभीर असल्याचं एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी सांगितलंय.याप्रसंगी उपस्थित असलेल्या मॅनेजिंग कमिटीच्या सदस्यांकडून घटनेची माहिती घेऊन सर्वानुमते याबाबत आज  बैठकीत कारवाईबाबत निर्णय घेण्यात आल्याचं विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

योग्य संदेश मिळावा यासाठीच MCAच्या सदस्यांचा एकमताने बंदीचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि नियमांसमोर सर्व सारखेच आहेत. शाहरुखने माफी न मागितल्यामुळे एमसीएने बैठकीत घेतला निर्णय पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला, असे विलासराव म्हणाले. वानखेडेवर अभिनेता शाहरुख खाननं धक्काबुक्की केल्याच्या  एमसीएच्या पदाधिका-यांच्या आरोपानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत. त्यानंतर बैठक  झाली.

 

बॉलीवूडचा डॉन शाहरुख खाननं मुंबईच्या वानखेडेवर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. सिक्युरिटी गार्डसनं रोखल्यानंतर त्यानं अर्वाच्य भाषा तर वापरलीच शिवाय धक्काबुक्कीही केली. याप्रकरणी शाहरुखसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  हा सीन रिल लाईफमधील असला तरी शाहरुखनं रिअल लाईफमध्येही असाचं धिंगाणा घातलाय... मुंबई इंडियन्सवर केकेआरने मात केल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर देवदास शाहरुखनं हा धिंगाणा घातला.. झिंगलेल्या किंग खानने सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ आणि मारहाण तर केलीच, मात्र एमसीए आणि बीसीसीआयच्या अधिका-यांनाही धमक्या दिल्या. बाजीगरच्या या फुल टू फिल्मी स्टाईल ड्राम्यामुळं वैतागलेल्या MCA नं अखेर मरिन लाईन्स पोलीस स्टेशनात शाहरुखविरोधात तक्रार नोंदवली होती.

 

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="103454"]